राफेलची दुसरी तुकडी पंधरवड्यात येणार

नवी दिल्ली  – भारतीय हवाई दलाला बळ देणाऱ्या राफेल विमानांची दुसरी तुकडी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्‍यता आहे. या तुकडीत तीन ते चार विमाने असतील. हरियाणातील अंबाला विमानतळावर ती नोव्हेंबरमध्ये दाखल होतील.

ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या तुकडीतील विमानांच्या समावेशानंतर राफेलच्या लढाऊ विमनांची संख्या आठ ते नऊ होईल. सध्या चीनशी असणाऱ्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ती तातडीने वापरात आणण्यात येतील.

राफेलची पहिली तुकडी भारतात 28 जुलैला आली होती. मात्र, त्यांचा भारतीय हवाई दलात औपचारिक समावेश 10 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता. त्यावेळी फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पॅरी यांच्यासह भारतीय दल प्रमुख बिपीन रावत, हवाई दल प्रमुख आर. के. एस. बदौरिया उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.