मुंबई – आज भाऊबीज आहे. बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मगणी केलीय.
“तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली आहे.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे-
तिला शिकू द्या
जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या
समाज भक्कम करायचा असेल तर
तिला आधी सक्षम होऊ द्या.#दिवाळी च्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या👉 https://t.co/eOY2BE0O8D #bhaidooj2020 #BhaiDuj pic.twitter.com/17cfvdQE9A— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 16, 2020
अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे – तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या,’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एक गाणं पोस्ट केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे.
आज समाजात स्त्रिया पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या दिशेने वाटलाच करताहेत. सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत. तरीही स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, अत्याचार यांसारख्या घटना घडत असतात. म्हणून अमृता फडणवीस यांनी हे सगळं टाळण्याचं आवाहन त्यांच्या या गाण्यातून केलं आहे.