सिद्धटेक-अष्टविनायकापैकी दुसरा मानाच्या सिद्धटेकच्या सिद्धविनायकाची आरती कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे आजपासून उघडण्यात आली आहेत.
अष्टविनायकापैकी मानाचा दुसरा गणपती अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आज भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते सिद्धिविनायकाची आरती करण्यात आली. गेल्या आठ महिन्यानंतर आज पहिल्या दिवशी भाविकांनी सिद्धीविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले.