अभिनेता रणबीर कपूर स्टारर चित्रपट ‘अॅनिमल’ हा 2023 चा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. या चित्रपटाची धमाकेदार पोस्ट रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना एक मोठी भेट देताना, निर्मात्यांनी 28 सप्टेंबरला म्हणजेच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला ‘अॅनिमल’ चा मोस्ट अवेटेड टीझर रिलीज केला आहे. टीझर खूपच आक्रमक आहे.
‘अॅनिमल’चा टीझर धमाकेदार
टीझरच्या सुरुवातीला अनिल कपूर रणबीर कपूरला चापट मारताना दिसत आहे.. म्हणतो, आम्ही एक गुन्हेगार तयार केला. यानंतर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना दिसतात आणि रणबीर रश्मिकाला सांगतो की, माझे वडील जगातील सर्वोत्तम वडील आहे. यानंतर रणबीरचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो आणि अॅक्शन सीन्सही पाहायला मिळतात. टीझरच्या शेवटच्या भागात बॉबी देओल दिसत आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरचा हिंसक लूक पाहायला मिळतो. यावरून तो या चित्रपटात आपल्या खतरनाक लूकने छाप पाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिनिट 29 सेकंदाच्या क्लिपमध्ये निर्मात्यांनी ‘अॅनिमल’ उर्फ रणबीर आणि त्याच्या अॅक्शन-पॅक सीन्सची झलक दिली. एक गँगस्टर ड्रामा मानल्या जाणाऱ्या या मनोरंजक चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत आहे, ज्याची कथा वडील आणि मुलाच्या ताणलेल्या नात्यावर केंद्रित आहे. अनिल कपूर ‘अॅनिमल’मध्ये रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंदान्ना रणबीरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बहुत काम बाकी है पापा, उसको मारना है..’ रणबीरचा हा डायलॉग चांगलाच प्रेक्षकांच्या मनावर छाप पडतो. एनिमलच्या टीजरमध्ये रणबीर, बॉबी देओल आणि अनिल कपूरचा स्वैग बघायला मिळणार आहे. तर रश्मीकाचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. नंतर ऑगस्टमध्ये, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘गदर 2’ आणि अक्षय कुमार स्टारर ‘OMG 2’ सोबत टक्कर देत होता. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी रिलीजची तारीख वाढवली आहे. आता हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.