Devendra Fadnavis । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकेसाठी सर्वांनाच परिचीत आहे. त्या आपल्या ट्विटरवरून देखील राजकीय टीका करताना दिसतात अशात पूर्वी केलेल्या राजकीय खुलासावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या राजकीय विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर अमृता फडणवीस यांनी खुलासा केला होता की, देवेंद्र फडणवीस हुडी घालून रात्री बाहेर पडायचे. त्यांच्या या विधानावर जेव्हा कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावता आली तर बरं होईल’ असं म्हणत असत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि आमची भेट रात्री उशिरा व्हायची अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती. अमृता फडणवीस यांनी देखील शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केलं होत. देवेंद्रजी रात्री वेष बदलून शिंदेंना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातलेले देवेंद्रजी मलाही ओळखू येत नसल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
Pune । पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं
शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला कोणी कोणी दिले समर्थन ? ; काय राहणार सुरु अन् बंद? वाचा