मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता राज्यात नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना जाहीर विरोध करण्यात येत आहे.
आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतला आहे.
या सिनेमावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे आपलं मांडल आहे. पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,”काहीही नाकारण्याचं किंवा लपवण्याचं कारण नाही असं मला प्रामाणिक वाटतं. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये.”