amol kolhe VS ajit pawar । राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांच्यात देखील राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह असा वाद पाहायला मिळत असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
मात्र, यामध्ये खास करून आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा या नेत्यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना ‘काका, का म्हणत दिलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला होता. त्यावर, अजित पवार आणि इतिहासाचा संबंधच नाही, अजित पवारांना इतिहासाची माहिती नाही..’, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
त्यानंतर, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या काका, का… या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना भलीमोठी कविताच म्हणून दाखवली. काटेवाडी पासून ते कारगिलपर्यंत महाराष्ट्रासमोर दिल्लीला झुकवायला काकाच, हवा असतो, असं अमोल कोल्हे आपल्या कवितेतून म्हंटले.
काय आहे? अमोल कोल्हेंची कविता, पाहा……
कुणीतरी म्हणालं काका का?
जनता म्हणाली अजूनही काकाच का?
पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं
तरी अजूनही काका, का काका?
बोलवताना धनी पुरेपूर जाणतो काका का,
पण महाराष्ट्राल पक्क ठाऊक आहे, काकाच का?
कारण, काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो
50 वर्षे महाराष्ट्राच्या मातीतून, महाराष्ट्राच्या माणसांतून वाहणारा
काका एक विचार असतो
सर्वसामान्य शेतकरी, महिला प्रत्येक वर्गाला
मुजोर व्यवस्थेला का? हा प्रश्न विचारण्याची ताकद देतो
काटेवाडीच्या का पासून ते कारगिलच्या का पर्यंत
काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळाच्या का पर्यंत
महाराष्ट्राची, दिल्लीतली ओळख काका, काकाच असतो
कांदा, कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत
प्रत्येक शेतकऱ्याचा आधारा काका असतो
शेताच्या बांधावर काका असतो, विचारवंतांच्या बैठकीत काका असतो
उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो, म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो
म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्रसमोर झुकवण्यासाठी काका हवा असतो
महाराष्ट्राला स्वाभीमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो
म्हणूनच, काका का आणि काकाच का हे स्वाभीमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो…