NCP Disqualification Case Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपला निकाल आज जाहीर केला आहे. अजित पवार गट हीच मूळ राष्ट्रवादी असल्याचे यावेळी नार्वेकरांनी जाहीर केले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून नार्वेकरांच्या या निकालाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा खून होत आहे आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती याला निकाल म्हणते चुलीत घाला तुमचा निकाल अशी उद्विग्न प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
या निकालाला ना ऐतिहासिक महत्व आहे ना कोणता अभ्यास आहे. समोर दिसत आहे कि एका पक्षाचा खून होतोय. लोकशाहीचा खून होत आहे आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती याला निकाल म्हणते चुलीत घाला तुमचा निकाल असा संतप्त संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. | NCP Disqualification Case Sanjay Raut
विधानसभा अध्यक्ष हे रामशास्त्री आहेत का ? ते दाम शास्त्री आहेत असा खोचक टोला देखील यावेळी राऊत यांनी लगावला. तसेच वरून निकालाचा कागद आला आणि अध्यक्षांनी तो वाचून दाखवला असल्याचा देखील राऊत यावेळी म्हणाले. | NCP Disqualification Case Sanjay Raut
न्यायालयात जाण ही कायदेशीर प्रक्रिया सर्वांनाच करावी लागते. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला देखील कोर्टात जावे लागले. तसेच आजचा हा निर्णय काळ निर्णय आहे आणि त्याविरोधात कोर्टात जावे लागेल असं देखील संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले. | NCP Disqualification Case Sanjay Raut
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. आज 15 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल जाहीर केला आणि पक्ष अजित पवार यांचाच आहे यावर शिक्कामोर्तब केलं.
राहुल नार्वेकरांच्या निकालातील महत्वाचे मुद्दे
विधिमंडळाच्या बहुमतवर पक्ष ठरणार
दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेनुसार नेतृत्व निवडण्याचा दावा केला आहे.
प्रतिनिधी निवडल्याचे शरद पवार गटाचे पुरावे नाहीत.. राष्ट्रीय कार्यकारणीत पवार गटाला बहुमत स्वीकारले जाऊ शकत नाही.
मूळ पक्ष आम्हीच असा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
अजित पवार गटाला शरद पवार गटापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा
विधिमंडळाचे बहुमत देखील अजित पवारांच्या बाजूने आहे.
अजित पवार गटाचे बहुमत हे निर्विवाद आहे.
अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी आहे.
शरद पवार गटाचे आमदारही पात्र करण्यात आले आहेत.