विपूर अमृतलाल शहा यांच्या वक्त; द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटाला 20 एप्रिल रोजी 16 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पिता पुत्राची भूमिका साकारली होती. परस्परांवर प्रचंड प्रेम करणारे हे बाप आणि मुलगा, परंपरा, कुटुंब संस्कार, नीतिमूल्ये, सुंदर गाणी यामुळे इतक्या वर्षांनतरही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो आणि तो आजही तितकाचा फ्रेश वाटतो.
या चित्रपटाच्या संदर्भात विपूल शहांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. तेव्हा त्यांच्या आँखे या चित्रपटात बच्चन आणि अक्षय हे दोघे काम करत होते. त्यावेळी आतिश कापडिया यांचे एक गुजराथी नाटक आपल्या समोर आले होते. तेव्हा आपण अमितजी आणि अक्षय या दोघांशी त्यावर चर्चा केली. यावर चित्रपट करण्याची इच्छा आपण त्यांना बोलून दाखवली. या चित्रपटाद्वारे निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचा आपला मानसही आपण त्यांना बोलून दाखवला.
तेव्हा या दोघांनी कोणतेही मानधन न घेता काम करण्याची तयारी बोलून दाखवली. दोघे बडे स्टार आहेत. माझ्या चित्रपटासाठी मोफत काम करण्याची त्यांनी व्यक्त केलेली इच्छा ही गोष्टच अगदी हृदयस्पर्शी होती, असे विपूल शहा यांनी नमूद केले.
त्यानंतर त्यांनी आणि चित्रपटाचे अन्य निर्माते मनमोहन शेट्टी यांनी या दोघा कलकारांना मानधन दिले आणि हा चित्रपट केला. या दोघांनी प्रथमच पिता-पुत्राची भूमिका साकारली होती व ती प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर या चित्रपटाने इतिहास रचला असे शहा सांगतात. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.