श्‍वेताचा सोशल मीडियावर जलवा

श्‍वेता तिवारी हे नाव प्रेक्षकांसाठी नवे नाही. छोटा पडदा तिने गाजवला आहे. तेथील काही मालिकांमध्ये तिने प्रदीर्घ काळ लीड रोल केले आहेत. चित्रपटांत मात्र तिने जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले नाहीत. मात्र, छोट्या पडद्यामुळे तिला देशभरात ओळख मिळाली आहे. आज ती चाळीशीत आहे व गेल्या काही काळापासून ती सोशल मीडियावर सातत्याने आपले फोटो अपलोड करते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)


त्यामुळे चर्चेत असून तिच्यातला हा बदल सुखद धक्‍के देणारा आहे. साधारणत: चाळीशी हे नायिकेचे निवृत्तीचे वय असते. कलाकार अभिनयात कितीही बाप असला तरी वय लपवले जाऊ शकत नाही. सुदैवाने नायकांसाठी आता त्यांच्या वयानुरूप भूमिका लिहिल्याही जात आहेत. मात्र नायिकांच्या तेही छोट्या पडद्यावरच्या नायिकांच्या बाबतीत तसे अभावानेच घडते आहे. असे असले तरी श्‍वेताला चांगली मागणी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

त्यामुळे तिचे फोटोही हॉट केकसारखे विकले जात आहेत. खासगी आयुष्यातील वादळांमुळे ती पूर्वी चर्चेत असायची. मात्र आता तिच्या चांगल्या दिसण्यामुळे आता ती चर्चेत असते. मात्र हे चांगले दिसणे काही सहजसाध्य नसते. त्याकरता जीममध्ये भरपूर घाम गाळावा लागतो. तोंडावर प्रचंड बंधन घालावे लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

अगदी शिस्तीत आयुष्य जगावे लागते. ते सगळे श्‍वेताने केले आहे अथवा करत असावी म्हणूनच तिचे चाळीशीतील फोटोही धुमाकूळ घालत आहेत. विशेष म्हणजे अश्‍लील या वर्गात न मोडणारे फोटो अपलोड करूनही तिची चर्चा होतेय हे महत्तवाचे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.