Amitabh Bachchan: बॉलीवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. आगामी चित्रपट आणि वैयक्तिक गोष्टींबाबत ते अनेक माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच अमिताभ यांनी त्यांचा ‘स्विमिंग ड्रेस’मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातील त्यांचा लुक पाहून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर करत त्यांनी स्विमिंगबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांनी बनियन, मॅचिंग शॉर्ट्स आणि त्यावर स्विमिंग जॅकेट आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे. सोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “एबी : एक्सक्यूज मी सर..” गाइड : हा.. एबी : अमेरिका किती लांब आहे? गाइड : शांत बसा आणि स्विमिंग करा.” सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’, ‘मोदीजी वर्सेस अमिताभ बच्चन,’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अमिताभ बच्चन ‘गणपथ’ या चित्रपटात दिसले होते. याशिवाय नुकतेच त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा निरोप घेतला. यावेळी ते भावुक झाल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता. त्यानंतर आता ते ‘कल्की 2898’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी हे कलाकार देखील असणार आहेत.