पाचगणी – पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात अनाधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश सातारा जिल्हाअधिकारी जितेंद्र दुडी यांनी महाबळेश्वर महसुल विभागाला दिले होते.
जिल्ह्या अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावनी करत पहाटेपासुनच महसुल विभाग महाबळेश्वर यांनी , पुस्तकाचे गाव भिलार, खिंगर भोसे येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. जेसीबी व पोकलेन यांच्या माध्यमातुन अनाधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला.
नाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले
पुस्तकाच गाव भिलार येथील मुबंईच्या एका बिल्डरचे अंदाजे २५०० स्केअर फुटचे भले मोठे बांधकाम महसुल विभागाने बुल्डोझरच्या माध्यमातुन जमिनोदोस्त केले . महसुल विभागाकडुन करण्यात येणारी सर्व यंत्रणा भल्या पहाटेच अॅक्शन मोडवर आल्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महसूल विभागाकडून कारवाई
महसुल विभागाला जिल्हा अधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलीस दलासह, महाबळेश्वर तहसिलदार तेजस्वीनी कोचरे पाटील, पाचगणी सर्कल पारवे, यांच्यासह पाचगणी तलाठी पाटील यांच्यासह महसुल विभागाचे सर्व कर्मचारी व कडेकोट पोलीस बंदोबस्तात महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.