नवी दिल्ली – पंजाबमधील राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे मोठी समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे.
कारण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीमुळे अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सत्ता में बैठे मठाधीशों के अहंकार को ठेस पहुँची है। क्योंकि एक दलित को मुख्यमंत्री बना दिया तो वो पूछते हैं कि कांग्रेस में फ़ैसले कौन ले रहा है?दलित को सर्वोच्च पद दिया जाना उन्हें रास नहीं आ रहा।
दलित विरोधी राजनीति का केंद्र और कहीं नहीं, अमित शाह जी का निवास बना हुआ है।
1/n— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) September 29, 2021
तर दुसरीकडे काँग्रेसने या भेटीवरून भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी अमित शाह यांचं घर दलितविरोधी राजकारणाचं केंद्र झाल्याची टीका केली आहे. ते पुढे म्हणाले,’एका दलित व्यक्तीला पंजाबचा मुख्यमंत्री बनवल्याने सत्तेत बसलेल्यांच्या गर्वाला धक्का लागला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नक्की निर्णय़ कोण घेत आहे, असा सवाल ते उपस्थित करत आहे.’
ते पुढे म्हणाले,’अमित शाह यांचं घर दलितविरोधी राजकारणाचं केंद्र झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. एका दलित व्यक्तीला पंजाबचा मुख्यमंत्री बनवल्याने सत्तेत बसलेल्यांच्या गर्वाला धक्का लागला आहे.’ असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर टीका केली आहे.
दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस हायकमांडविषयी नाराजी देखील बोलून दाखवली होती. “दोन महिन्यात तीन वेळा राज्यातील आमदारांना हायकमांडनं दिल्लीला बोलावलं. जणूकाही माझ्या नेतृत्वावर त्यांना संशय आहे. मला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे. आता त्यांना ज्यांच्यावर विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील”, असं अमरिंदर सिंग म्हणाले होते. त्यामुळ काँग्रेस पक्षनेतृत्वावर त्या्ंनी आपली नाराजी उघड केली होती. त्याचवेळी “पुढील सर्व पर्याय माझ्यासाठी खुले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याविषयी निर्णय घेईन”, असे संकेत देखील त्यांनी दिले होते.