कर्जतमध्ये आज अमित शहा, शरद पवार आमने-सामने

जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. उद्या सांयकाळी प्रचाराची सांगता होणार असून प्रा. शिंदे यांच्या प्रचाराची सांगता सभा कर्जतमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता तर रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सकाळी 11 वाजता कर्जत शहरात सभा होत आहे.

यावेळी राष्ट्रवादी व भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पवार व शाह यांच्या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षाकडून उद्या कोणता राजकीय भूकंप होणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रा. शिंदे विरुद्ध पवार अशी दुरंगी लढत होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रा. शिंदे यावेळी हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत.

शिंदे यांनी मात्र पवार यांना मतदारसंघापासून वंचित ठेवण्याचा चंग बांधला आहे. विद्यमान मंत्री राम शिंदे यांना सन 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यमंत्री व नंतर केबिनेट मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी कर्जत जामखेड तालुक्‍याला मोठ्या प्रमाणावर विकासकामासाठी निधी दिला. विकास कामे करीत असताना सर्वसामान्य कार्यकर्ते व जनता शिंदे यांच्याकडून दुरावली गेली. याचाच फायदा घेत गेल्या एक वर्षापासून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदारसंघाकडे लक्ष देऊन नागरिकांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा तसेच विविध सामाजिक उपक्रम घेऊन थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यास रोहित पवार यशस्वी झाले.

लोकसभा निवडणुकीतही खा. डॉ सुजय विखे यांना कर्जत- जामखेड मतदारसंघातून सर्वात कमी मताधिक्‍या मिळण्यामागेही रोहित पवार यांचे संघटन यशस्वी झाले. त्यामुळे मतदारसंघात पवार यांनी बस्तान वाढविण्यास सुरवात केली. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार यंत्रणा सक्रिय करत प्रचारात आघाडी घेतली. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजीमंत्री सुरेश धस, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सभा घेतला तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी माजी उपमुख्यंमत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सभा घेऊन गेल्या आठ दिवसापासून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडण्यात आल्या.

उद्या दि 19 रोजी निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शिंदे यांच्या प्रचारार्थ अमित शाह व रोहित पवार यांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता शरद पवार यांची कर्जतमध्ये प्रचाराची सांगता सभा होत आहे. त्यामुळे कर्जतमध्ये भाजप व राष्ट्रवादीकडून जोरदार शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. देशातील दोन दिग्गज नेते आपआपल्या पक्षाच्या प्रचारासाठी येणार कर्जत शहरात येत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण येणार असून बाहेरील राज्यातून अतिरिक्त कुमक बोलविण्यात आले आहे. तसेच कर्जत शहराला जोड ण्याच्या रस्त्याचे मार्गहि बदल ण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)