पाटणा : बिहारमध्ये कॉंग्रेसच्या राजवटीच्या काळात त्यांचे व्यावसायिक काम करून घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लाच दिली होती, असे विधान बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी यांचा 16 नोव्हेंबरला केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे. त्यावरून सोशल मिडियात चांगलाच कलगी तुरा रंगला आहे. यात मोदी म्हणातात, मैने एक बार अमित शाहजीसे पुछा आप पहिली बार कब आये थे? तब उन्होने बताया की, 25 साल पहले मैं व्यापार करता था। पाइप का बिझनेस करते थे। उन्होने यहॉं पर एक विभाग में पाईप की सप्लाय की थी। लेखीन उसके बकाये के भुगतान नही हो पा रहा था। जिसके लिये वो बिहार आये थे। त्यानंतर त्यांनी लाच देऊन हे बिल मंजूर करून घेतल्याचे मला सांगितले, असे मोदी म्हणाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.