Amisha Patel : चित्रपट निर्माता जोडी अब्बास-मस्तान बाजीगर, सोल्जर आणि बादशाह यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखली जाते. यासोबतच बॉबी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट हमराज हा त्यांचा आणखी एक उत्तम चित्रपट आहे.
सध्याच्या काळात सिक्वेलचा वाढता ट्रेंड लक्षात घेता ‘हमराझ’चा सीक्वलही बनवला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या बंपर यशानंतर, अमीषा पटेल तिच्या करिअरच्या हिट चित्रपट हमराजच्या भाग 2 मध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा आहे,
हमराज चित्रपटा प्रमाणे हमराज 2 मध्ये सुद्धा अमिषा पटेल बॉबी देओलसोबत रोमान्स करणार असल्याची चर्चा आहे. अब्बास-मस्तान आणि रतन जैन हमराज 2 ची योजना आखत आहेत. सध्या चित्रपटाची कथा कागदावर लिहिली जात आहे या चित्रपटात अक्षय खन्ना, बॉबी देओल आणि अमिषा पटेल या जुन्या स्टारकास्टसोबत मेकर्स परत येऊ शकतात.स्टार कास्ट जाहीर होईपर्यंत काहीही अधिकृत मानले जाऊ शकत नाही.
हमराज 2002 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कथा प्रेम त्रिकोणावर आधारित होती, ज्यामध्ये अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत सशक्त दिसत होता. एवढेच नाही तर या चित्रपटातील गाण्यांनीही रसिकांवर आपला विशेष प्रभाव सोडला. दमदार कथा आणि दमदार अभिनयामुळे हमराज बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.