Bollywood : अभिनेता इमरान हाश्मीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोमँटिक हिरोसह त्याने खलनायकाच्या देखील भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी इमरान हाश्मी ‘टायगर 3’ चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता इमरानची साऊथ इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री होणार आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक कलाकरांनी साऊथ सिनेमात काम केले आहे. त्यानंतर इमरान देखील साऊथ सिनेमात एका नव्या अवतारात पाहायला मिळणर आहे.
इमरान ‘गुडाचारी 2’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात नकारात्मक भूमिका करणार असल्याची चर्चा होत आहे. आदिवी शेषने ‘गुडाचारी’मध्ये काम केले आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता त्याचा सिक्वेल रिलीज होत आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट समोर आली नाही. पण जर तो ‘गुडचारी 2’ चा भाग बनला तर आदिवी आणि इमरानला एकाच फ्रेममध्ये पाहता येणार आहे.
दरम्यान, ‘गुडाचारी 2’ ची अधिकृत घोषणा डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विनय कुमार सिरीगिनेदी यांच्याकडे आहे. ‘गुडाचारी’चा सिक्वेल संपूर्ण भारततात हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
इमरान हाश्मी शेवटचा ‘टायगर 3’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने सलमान खान आणि कतरिना कैफसोबत काम केले होते. यापूर्वी इमरान अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’ चित्रपटातही दिसला होता. परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला.