मुंबई – बॉलिवूडमधील आपल्या पहिल्याच चित्रपटाने चाहत्यांची मने मोहून टाकणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिला कोण ओळखत नाही? आपल्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करणार्या अमीषा पटेलने करिअरची सुरुवात 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटाने अमिषाला रातोरात सुपरस्टार बनवले.
गेल्या काळात अमिषाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले मात्र , या गोष्टींवर कधीही अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही आणि स्वत: अमिषाने याविषयी काहीही म्हटले नाही. पण आता मात्र आमिषाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अमीषाने नुकतेच फैसल पटेलला ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटनंतर अमीषा पटेल फैसलला डेट करत असल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास अभिनेत्री अमीषा पटेल सुपरहिट फिल्म ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा भाग 2 मधून बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे.