नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली.
In Shri Ahmed Patel, I’ve lost a colleague, whose entire life was dedicated to Congress. I’ve lost an irreplaceable comrade, a faithful colleague & a friend. Feel deeply for his bereaved family to whom I offer my sincere feelings of empathy & support: Sonia Gandhi, Congress pic.twitter.com/ygiXEN9JH4
— ANI (@ANI) November 25, 2020
‘जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोनाचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणे टाळून करोना नियमांचे पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचे पालन करा, असे फैजल पटेल यांनी म्हंटले आहे.
@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020