न्यूयॉर्क – आनास्ताशिया पावलुशेन्कोव्हाने महिला एकेरीत तर, अलेक्झांडर ज्वेरेवने पुरुष एकेरीचे तिसऱ्या फेरीचे सामने जिंकत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे.
जर्मनीच्या ज्वेरेवने जॅक शॉकचा 3-6, 6-2, 6-3, 2-1 असा पराभव केला. खरेतर हा सामना ज्वेरेवने पूर्ण वेळेतच जिंकला असता मात्र, शॉकने दुखापतीने चौथ्या सेटनंतर सामना सोडून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या लॉइड हॅरीसने स्पर्धेतील सनसनाटी निकाल नोंदवताना कॅनडाच्या डेनिस शापोलाव्हचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला.
महिलांच्या लढतीत रशियाच्या पावलुशेन्कोवाने आपल्याच देशाच्या वरवरा घेरेव्हावर 6-1, 6-4 अशी मात केली. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या अजला तोमीनजोव्हीकवर 6-3, 6-2 अशी मात केली. पोलंडच्या इगा स्वेटेकने इस्टोनियाच्या अनेट कोंतावेटचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव केला.
मेदवेदेवने पाब्लो अँडुआरचा 6-0, 6-4, 6-3 असा पराभव केला. अमेरिकेच्या फ्रान्सेस तैफुने आंद्रे रुब्लेव्हला 4-6, 6-3, 7-6 (8-6), 4-6, 6-1 असे पाच सेटमध्ये हरवले उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. डेनिस शापोवालोव्हने रॉबटरे कार्बालेसवर 7-6 (9-7), 6-3, 6-0 असा विजय मिळवला.
महिलांमध्ये कॅनडाच्या किशोरवयीन लेला फर्नाडेझने गतविजेत्या ओसाकावर 5-7, 7-6 (7-2), 6-4 अशी पिछाडीवरून मात केली. या पराभवानंतर 23 वर्षीय ओसाकाने पुन्हा एकदा टेनिसमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचे संकेत दिले. ओसाकाने जून महिन्यात फ्रेंच स्पर्धेतूनही मानसिक आरोग्याशी निगडित समस्येमुळे मध्यातच माघार घेतली होती.
महिला एकेरीच्या अन्य लढतींमध्ये सबालेंकाने डॅनिएल कॉलिन्सला 6-3, 6-3 असे पराभूत केले. गर्बिन मुगुरुझाने व्हिक्टोरिया अझारेंकावर 6-4, 3-6, 6-2 असा विजय मिळवला. बार्बरा क्रेजिकोव्हाने कमिला राखीमोव्हाला 6-4, 6-2 असे नामोहरम केले.