न्यूयॉर्क – बेलारूसच्या आर्यना सबालेंका हिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गठली आहे. सबालेंकाने चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेजीकोव्हावर 6-1, 6-4 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. अन्य लढतीत कॅनडाच्या लेलाह फर्नांडेजने स्पर्धेतील आश्चर्यजनक निकाल नोंदवताना युक्रेनच्या एलिना स्वीतोलिनाचा 6-3, 3-6, 7-6 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीच्या लढतीत फेलिक्स एलिस्मीने धक्कादायक निकाल नोंदवताना प्रथमच
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. त्याला नशिबाचीही जोड मिळाली. या सामन्यात स्पेनच्या कार्लोस गार्फियाने दुखापतीने माघार घेतल्याने एलिस्मीला पुढे चाल मिळाली.
या सामन्यात गार्फियाने पहिला सेट 6-3 असा गमावला होता व दुसऱ्या सेटमध्ये 3-1 असा पिछाडीवर होता. त्यावेळीच त्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
भारताचे आव्हान संपले
भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान डोडिंग यांना राजीव राम आणि जो सॅलिसबरी या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील पुरुष दुहेरीतील आव्हान संपले आहे. बोपन्ना-डोडिंग जोडीला दोन तास आणि 30 मिनिटांच्या या सामन्यात 7-6 4-6 6-7 असा पराभव स्वीकारावा लागला.
सानिया मिर्झा पहिल्या फेरीत महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत पराभूत झाली, तर अंकिता रौनाही महिला दुहेरीत पराभूत झाली. प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन एकेरी प्रकारातील मुख्य स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयशी ठरले त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.