मंचर -आंबेगाव तालुक्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 96 झाली असून वाटचाल शंभरीकडे सुरू आहे. रविवारी (दि. 12) सकाळपर्यंत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 13 ने वाढली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये मंचर येथील 8, लांडेवाडी येथील दोन, नारोडी येथील एक, पारगाव शिंगवे येथील एक, कोलदरे येथील एका रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले जवळजवळ शंभर नागरिकांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहे. तालुक्यातील 96 रुग्णापैकी 56 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 37 जण उपचार घेत आहेत तर तिघांचा मृत्यू झाला. एकट्या मंचर शहरात बाधितांची संख्या 22 झाली आहे.