दलितांवरील अत्याचार रोखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी

आरपीआयच्या वतीने मार्केट यार्ड चौकात निदर्शने
नगर(प्रतिनिधी) –
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौध्दांवर वाढत्या अत्याचाराचा तसेच मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेले राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आरपीआयचे राज्य सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, शहराध्यक्ष अमित काळे, संजय कांबळे, अविनाश भोसले, विनोद भिंगारदिवे, दीपक गायकवाड, दया गजभिये, सनी खरारे, प्रवीण वाघमारे, आरती बडेकर, विवेक भिंगारदिवे उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित आणि बौध्दांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच दलित युवकांची हत्या होत आहे. असे ही निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन कोतवालीचे पो.नि. लोखंडे यांना देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.