पुणे – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन 8 जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात घडली आहे.
याप्रकरणी आठ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. ही घटना रविवारी (दि.22) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. आकाश अरुण पवार (वय 24 रा. गणराज मित्र मंडळाजवळ, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बु.) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने भारती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंटी ऐनापुरे, रोहीत पाटेकर, औदत्य उर्फ बबलु फटके, लड्डी गायकवाड, शुभम हिरे, सार्थक मिसाळ, तुषार पवार, दरोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.