Amazon vs Future Retail : ऍमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या काय आहे प्रकरण

नवी दिल्ली – फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज दरम्यान झालेल्या व्यवहाराला हरकत घेणाऱ्या ऍमेझॉन कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या व्यवहाराला दिल्लीतील एक सदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिली होती.

ही स्थगिती नंतर दिल्ली उच्च न्यायालयातील विस्तारीत खंडपीठाने उठविली होती. या निर्णयाला ऍमेझॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. स्पर्धा आयोग व बाजार नियंत्रक सेबीच्या पुर्ण निर्णयाकडे लक्ष न देता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेझॉन कंपनीचे म्हणणे आहे.

अमेझॉन कंपनी आणि फ्युचर रिटेल दरम्यान झालेल्या व्यवहारातील अटी आणि शर्तीकडे दुर्लक्ष करून फ्युचर रिटेलने रिलायन्स कंपनीबरोबर व्यवहार केला असल्याचे अमेझॉन कंपनीचे म्हणणे आहे.

अमेझॉन कंपनीने ऑक्‍टोबर महिन्यात सिंगापूर येथील लवादात याचिका दाखल केली होती. लवादाने ऍमेझॉनच्या बाजूने निवाडा दिलेला आहे. ऍमेझॉन किंवा फ्युचर रिटेल कंपनीने यासंदर्भात वृत्त माध्यमांना थेट माहिती दिली नाही.

या व्यवहाराची आपण अमेझॉन कंपनीला माहिती दिली होती. मात्र अमेझॉन कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. आर्थिक अडचणींमुळे फ्यूचर रिटेल कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर व्यवहार करावा लागला, असे फ्युचर रिटेल कंपनीचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.