नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या 10 मार्चला स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेससह आम आदमी पक्षाने देखील चांगलाच जोर लावला होता. दरम्यान, निवडणुकीच्या निकालापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि लोक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली आहे.
अमरिंदर सिंग यांनी अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांना या भेटीबद्दल विचारले असता, अमरिंदर सिंग म्हणाले की, आपण अमित शहांसोबत सामान्य चर्चा केली आहे. पंजाब निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सविस्तर चर्चा करेल. असे म्हणत अमरिंदर सिंग यांनी भेटीचे निवडणुकीची काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
अमरिंदर सिंग यांना युतीबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, मी पंडित नाही, त्यामुळे भविष्यवाणी देखील करणार नाही. माझ्या पक्षाने आणि भाजपने चांगले काम केले आहे. त्यामुळे आता काय निकाल समोर येतात ते आपण बघू असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
20 फेब्रुवारीला पंजाबच्या 117 जागांवर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली होती. कॉंग्रेसने आपली सत्ता वाचवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. . तर अकाली दल सुद्धा यश मिळविण्यासाठी आतूर आहे.