पुणे – १९३८ मधे स्थापन झालेल्या कुसरो वाडिया महाविद्यालयाचा १२ वा माजी विद्यार्थी मेळावा रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता संस्थेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती प्राचार्य व्ही आर राव यांनी दिली.
यावर्षीचा ” डायमंङ आॕफ सिडब्लुआयटीयन ” हा पुरस्कार १९९२ च्या विद्युत अभियांञिकीचे चे विद्यार्थी ,इस्काॕनचे अनुयायी ,जगातील ५२ पेक्षा जास्त देशामध्ये आपल्या व्याख्यानासाठी प्रसिद्ध असणारे अध्यात्मिक गुरु श्री गौर गोपाल दास यांना प्रदान केला जाणार आहे . सत्कारार्थी प्रसिद्ध अध्यात्मिक व्यक्ती असल्यामुळे यावेळी कोणतेही ,कसलेही चिञण होणार नाही , विद्यार्थ्यांनी आवर्जुन ऊपस्थित रहावे अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा.अनिल शेलार यांनी दिली.