अकोले -माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.जितेंद्रभाऊ पिचड स्वयंसेवी संस्थेच्या वतीने अध्यक्ष शंभू नेहे यांनी अकोले तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोना लढाईत सुरक्षेसाठी फेस शिल्ड वाटप केले.
यावेळी उद्योजक राजेंद्र गोडसे, डॉ. रवींद गोर्डे, स्व.जितेद्रभाऊ पिंचड संस्थेचे शंभू नेहे, राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, भास्कर येलमामे, डॉ. दत्ता निगळे, शमसुद्दीन शेख, शंकर नेहे, स्वप्निल धुमाळ, रमेश पुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पिचड म्हणाले, करोना संकट काळात करोनाशी लढा देणारे, थेट संबंध येणारे डॉक्टर्स, नाकाबंदीवरील, चौकीतील पोलीस कर्मचारी, गावोगावी लक्ष ठेवणारे महसूलचे कर्मचारी, बॅंकेतील कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांना करोनाशी सामना करताना सुरक्षेची पुरेशी साधने देण्यास सरकार कमी पडले आहे. यासर्वाची समाजिक बांधिलकी नात्याने स्व. जितेंद्रभाऊ पिचड सेवाभावी संस्थेने अतिशय स्तुत्य उपक्रम आज घेतला आहे. नागरिकांनी आता या सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः ची काळजी स्वतः घ्यावी .कामाशिवाय जादा वेळ घराबाहेर जाऊ नये, असे अवाहन केले.