IPL 2024 Final : आयपीएलचा 17वा हंगाम आता शिगेला पोहोचला आहे. आज IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर संध्याकाी 7.30 वाजता सुरू होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाताने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, तर हैदराबाद 2016 मध्ये एकदाच चॅम्पियन ठरली आहे.
आयपीएलच्या या मोसमातील पहिला क्वालिफायर सामनाही दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात केकेआरने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. मात्र, या मोसमात पुन्हा एकदा दोन्ही संघ अंतिम फेरीत आमने-सामने येणार आहेत. हे विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावतील. दरम्यान, आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी एक मनोरंजक आकडेवारी पाहणे आवश्यक आहे. ही आकडेवारी आयपीएलच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची स्थिती सांगते. म्हणजेच नाणेफेक जिंकणारा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला आहे की त्या संघाच्या हाती निराशा लागली आहे?
आकडेवारीत, टाॅस गमावणाऱ्या संघांचे झाले आहे नुकसान…
आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 वेळा अंतिम सामना खेळला गेला आहे. अशा परिस्थितीत, जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला कळेल की नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे की नाही. त्यामुळे ही आकडेवारी पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की 12 वेळा नाणेफेक जिंकणारा संघच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला आणि 4 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी गमवावी लागली.
IPL 2008 – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – टॉस विजेता राजस्थान – सामना विजेता राजस्थान रॉयल्स
(राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.)
IPL 2009 – डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – टॉस विजेता बंगळुरू – सामना विजेता डेक्कन चार्जर्स
(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – टॉस विजेता चेन्नई – सामना विजेता चेन्नई सुपर किंग्स
(चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2011 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – टॉस विजेता चेन्नई – सामना विजेता चेन्नई सुपर किंग्ज
(चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2012 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – नाणेफेक विजेता कोलकाता – सामना विजेता कोलकाता नाइट रायडर्स (कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2013 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – टॉस विजेता मुंबई – सामना विजेता मुंबई इंडियन्स
(मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2014 – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – नाणेफेक विजेता कोलकाता – सामना विजेता कोलकाता नाइट रायडर्स
(कोलकाताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.)
IPL 2015 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – टॉस विजेता मुंबई – सामना विजेता मुंबई इंडियन्स
(मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2016 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – टॉस विजेता सनरायझर्स – सामना विजेता सनरायझर्स हैदराबाद
(सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2017 – मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट – टॉस विजेता मुंबई – सामना विजेता मुंबई इंडियन्स
(मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2018 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – नाणेफेक विजेता चेन्नई – सामना विजेता चेन्नई सुपर किंग्ज
(चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.)
IPL 2019 – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – टॉस विजेता मुंबई – सामना विजेता मुंबई इंडियन्स
(मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2020 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – टॉस विजेता दिल्ली – सामना विजेता मुंबई इंडियन्स
(दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2021 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – नाणेफेक विजेता कोलकाता – सामना विजेता चेन्नई सुपर किंग्ज
(कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.)
IPL 2022 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – नाणेफेक विजेता राजस्थान रॉयल्स – सामना विजेता गुजरात टायटन्स
(राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.)
IPL 2023 – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – नाणेफेक विजेता चेन्नई – सामना विजेता चेन्नई सुपर किंग्ज
(चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.)