मुंबई : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर 2022 करिता 18512 लाभार्थ्यांकरिता 277 मेट्रीक टन गहू, 370 मेट्रीक टन तांदूळ असे एकूण 647 मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे.
मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात डिसेंबरसाठी परिमंडळ अ, ड, ई, ग, फ मध्ये अत्योंदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिकाधारकास गहू २ रू किलो आणि तांदूळ 3 रू किलो प्रमाणे 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य वितरित करण्यात येणार आहेत.
डिसेंबर 2022 करिता शासनाकडून प्राप्त अंत्योदय अन्न योजनेचे परिमंडळ ड, ई, ग कार्यालयांच्या विक्रीच्या अहवालानुसार आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने सदर परिमंडळ कार्यालयास शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे.
Restaurant on Wheels | महाराष्ट्रातील ‘या’ चार स्थानकांवर सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सेवा
तसेच उर्वरित अ व फ परिमंडळ कार्यालयांना तांदूळ व गव्हाचे सप्टेंबर 2022 करिता अहवालानुसार 100 टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले आहे.