मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून सत्तेत आलेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून 50 खोक्यांवरून आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आता विरोधकांकडून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी ५० खोक्यांचा आरोप केल्याने त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू असे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.
काही महिन्यापूर्वी शिवसेनेतील बंडानंतर ’50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात विरोधकांनी केली होती. त्यानंतर त्यावरून आजपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना टीके लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवराळ भाषेत उत्तर दिले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. त्यावर शिवतारे म्हणाले,” माझा सुप्रिया सुळेंना सवाल आहे, माझा अजित पवारांवर विश्वास आहे. मात्र पहाटेच्या शपथविधी वेळी अजितदादांनी किती खोके घेतले”. हे विचारून महाराष्ट्राच्या जनतेचे सांगावे. 1978 साली शरद पवारांनी शरद पवारांनी सरकार स्थापन करण्यासाठी 38 आमदार फोडले होते. त्यावेळी शरद पवारांनी किती खोके दिले? हे देखील आम्हाला सुप्रिया सुळेंनी आम्हाला सांगावे.
दरम्यान, एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादासाठी आम्ही बाहेर पडलो. ही तत्त्वांची लढाई आहे असे शिंदे यांनी सांगितले. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी याला तत्वांची नाही तर खोक्यांची लढाई करुन टाकली. गेल्या काही दिवसात 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले आहेत. मात्र ही घोषणा काय आजही टीका करताना दिली जाते.
बच्चू कडू, रवी राणा यांच्या पुरताच 50 खोक्याचा वाद रंगला असे नाही. तर गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. दरम्यान, याच सर्व प्रकरणावर आता शिंदे गटाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.