नवी दिल्ली – विख्यात चित्रकार एम.एफ. हुसैन यांनी काढलेले पेंटिंग आपल्याला कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांच्याकडून खरेदी करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला होता, असा आरोप येस बॅंकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी केला आहे.
राणा कपूर यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हे आरोप म्हणजे राजकीय सूडनाट्य असल्याचा आरोप कॉंग्रेसच्यावतीने करण्यात येऊ लागला आहे. तर “गांधी कुटुंब’ खंडणीवादी आहे, असा आरोप भाजपच्यावतीने करण्यात येऊ लागला आहे.
प्रियांका ांधी यांच्याकडून एम.एफ.हुसैन यांचे पेंटिंग खरेदी करण्याची आपल्यावर जबरदस्ती करण्यात आली. या पेंटिंगच्या किंमतीचा विनियोग कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यासाठी केला गेला, असे राणा कपूर यांनी सक्त वसुली संचलनालयाला सांगितले होते. “ईडी’ने राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
जर हे पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबाशी संबंध निर्माण होऊ शकणार नाहीत. एवढेच नव्हे तर “पद्म भुषण’ किताब देखील मिळू शकणार नाही, असे तत्कालिन पेट्रोलियाम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितल्याचे राणा कपूर यांनी “ईडी’ला सांगितले होते.