अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयातील सर्व वाघ-सिंहांना करोनाची लागण

वॉशिंग्टन – अमेरिकेतील स्मिथसोनियान्स नॅशनल पार्क मधील सर्व वाघ-सिंहांना करोनाची लागण झाल्याचा पप्रथमिक अंदाज आहे. या सर्व वाघ-सिंहांच्या प्राथमिक चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती एका निवेदनात देण्यात आली आहे. स्मिथसोनियान्स नॅशनल पार्क हे अमेरिकेतील सर्वात जूने प्राणि संग्रहालय आहे.

या प्राणी संग्रहालयातील 6 सिंह, एक सुमात्रा वाघ आणि 2 बिबट्यांच्या जबड्यातील स्राव तपासणीस घेण्यात आले होते. त्यामध्ये या सर्व पशूंना करोनाची लागण होऊन गेली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला गेला आहे. या चाचणीचे अंतिम अहवाल अद्याप मिळणे बाक आहे आणि त्यासाठी आणखीन काही दिवस थांबायला लागणार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

या वाघ-सिंहांची भूक मंदावली आहे. त्यांना खोकला आणि सर्दीही झाल्यासारखे दिसते आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या वाघ-सिंहांची हालचालही मंदावली असल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे. या प्राणी संग्रहालयातील अन्य कोणत्याही प्राण्यांना करोनाची लागण झाल्याची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.