हडपसर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून देशात विकास केला.सबका साथ ,सबका विकास हे धोरण ठेवत आज अनेक योजना त्यांनी राबविल्या असून त्यांचा लाखों लाभार्थींना फायदा झाला आहे, असे मत नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व आधार प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आधार पतसंस्था ससाणेनगर हडपसर येथे मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे उद्घाटन माधवराव ससाणे,सुभाष ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी राजन ससाणे, रोहन ससाणे, ओंकार ससाणे, डॉ.शुभम लोंढे, स्मिता गायकवाड,कुणाल चौरे, उत्तम झुरुंगे, महेश बधे, माया ससाणे, शहाजी शेलार, विजय ससाणे, वृषभ सातव, दिगंबर बोराटे, श्रीधर देसाई, सतीश भिसे, विकास तावरे, राहुल धेंडे, अथर्व जाधव, संदीप चव्हाण, विकी मांडे, शिवा शिंदे, सचिन कोरे, सुमित गोरे, स्वप्नील चव्हाण, संभाजी धुमाळ उपस्थित होते, नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोहिमेला प्रतिसाद दिला.लसीकरण मोहिमेचे आयोजन नगरसेवक मारुती आबा तुपे, महेश ससाणे, मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान यांनी केले.