पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून 1 डिसेंबर पासून राज्य सरकारने पहिली ते आठवी पर्यत्नच्या सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र करोनाच्या नवीन व्हेरियंटने पुन्हा एकदा सर्वाचे ठोके वाढविले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पहिली ते आठवी प्रर्यंतच्या सर्व शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे.
शहरातील पहिली ते आठवी प्रर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात आज पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ व पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यात एक बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 डिसेंबर पर्यंत पुण्यातील शाळा बंद राहणार असून पुढिल निर्णय 15 डिसेंबर नंतर घेण्यात येणार आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनच्या या करोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस निर्बंध लागू करण्यात आले आहेत.