Ram Mandir Inauguration: येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्त सोमवारी (22 जाने.) अर्धा दिवस सरकारी कार्यालये बंद राहतील. याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी (18 जानेवारी) दिली.
सिंह म्हणाले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाईल. देशभरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातील निमंत्रित मंडळी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम भक्त आणि केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकारकडून या सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे.
याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेनेही ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हंटले आहे “अयोध्येतील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील.”
All central government offices across India will remain closed for half day on January 22, 2024 in view of Ram Lalla Pran Pratishtha ceremony at Ayodhya. pic.twitter.com/4Scs88RHxK
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2024