नवी दिल्ली : चीनच्या वुहानमधून सुटका करण्यात आलेल्या सर्व 645 जणांपैकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नाही. त्या सर्वांच्या चाचणीचे निकाल नकारात्मक आल्याचे आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी स्पष्ट केले.
या सर्वांना लष्कर आणि आयटीबीपीने उभारलेल्या रुग्णालयात देखरेखी ठेवण्यात आले आहे. आता पर्यंत केरळमध्ये तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तिघेही वुहान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, कोरोनाची साथ पसरल्यापासून म्हणजे सहा फेब्रुवारीपासून एक हजार 265 निमान फेऱ्यांतून आलेल्या एक लाख 38 हजार 750 रुग्णांची तपासणी विमानतळावर करण्यात आली होती. आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. आरोग्य महासंचालकांच्या अध्षतेखअली गुरूवारी बैठक घेण्यात आली. त्यात साथ उद्भवल्यास तीात्रक बाबींची चर्चा करण्यात आली.