दिल्लीत सत्ता ‘आप’लीच; शहांनी सांगितला आकडा

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान राजकीय सर्वेक्षणामध्ये आम आदमी पार्टीचे सरकार पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्वेक्षणाला आव्हान दिले असून भाजप दिल्लीत ४५ पेक्षा अधिक जागांवर जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये तुफान घमासान सुरू होतं. आज त्याला पूर्णविराम मिळाला असला तरी पडद्यामागचा प्रचार अजून थांबला नाही. शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान होईल. आणि मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

चुनाव के दौरान दिल्ली की जनता से संवाद करने का मौका मिला। झूठे वादे, तुष्टिकरण और अराजकता से त्रस्त दिल्ली को अब बस विकास चाहिए।

दिल्ली में भाजपा के लिए जो समर्थन देखा है उससे ये साफ है कि 11फरवरी को भाजपा दिल्ली में 45 से अधिक सीट जीत कर सरकार बनाने जा रही है। #BJP45PlusInDelhi

— Amit Shah (@AmitShah) February 6, 2020

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.