आलिया भटने “सडक 2′ चे शुटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात तिची बहिण पूजा भट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर हे मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याच्या शिवाय संजय लिला भन्साळीच्या “गंगूबाई काठियावाडी’मध्येही आलिया काम करते आहे.
या सिनेमाच्या तयारीचा एक भाग म्हणून आलिया सध्या गुजरातमधील कैथी म्हणजेच काठी ही बोली भाषा शिकते आहे. संजय लिला भन्साळीच्या सिनेमामध्ये काम करायची संधी मिळावी, ही तिची बऱ्याच दिवसांपासूनची ईच्छा होती.
“गंगूबाई…’च्या निमित्ताने तिला ही संधी मिळाली आहे आणि त्यामध्ये कोणतीही कसर सोडण्यास ती अजिबात तयार नाही. यापूर्वी “2 स्टेट्स’साठी आलियाने तमिळ शिकून घेतली होती. त्यामध्ये तिच्याबरोबर अर्जुन कपूर होता. दक्षिणात्य स्टाईलमधील् आलियाल प्रेक्षकांनी खूप पसंतीही दिली होती.
याशिवाय “राजी’ साठी आलियाने उर्दू शिकून घेतली होती. या सिनेमात पाकिस्तानात जाऊन हेरगिरी करणाऱ्या भारतीय तरुणीचा तिचा रोल होता. आता कैथी म्हणजेच काठी बोली भाषा बोलणारी आलिया आणखीनच गोड वाटेल.