मुंबई – सध्या बॉलिवूडवर बहिष्कारापासून ते घराणेशाहीपर्यंत अनेक पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत. आलिया भट्ट देखील आजकाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे, स्टार किड असल्याने तिला खूप ट्रोल केले जात आहे. मात्र, आलिया भट्टने तिच्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिरस्कार करणाऱ्यांना ती आपल्या चित्रपटातून उत्तर देऊ शकते, असे तीचे म्हणणे आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हणाली की,’जर मी ‘गंगूबाई काठियावाडी’ सारखा चित्रपट दिला तर कोणाला हसण्याची संधी मिळाली? जोपर्यंत मी माझा पुढचा फ्लॉप देत नाही तोपर्यंत मी हसत आहे. आलिया पुढे म्हणाली, ‘मी प्रत्येक वेळी शब्दात उत्तर देऊ शकत नाही आणि जर तुम्हाला मी आवडत नसेल, तर माझ्याकडे पाहू नका, मी याबद्दल काहीही करू शकत नाही.’
आलिया भट्ट म्हणाली की,’मला ट्रोलर्सच्या कमेंट्सबद्दल वाईट वाटते, परंतु लोकांकडून तिच्या कामासाठी मिळणारे प्रेम आणि आदर यापेक्षा काही नाही.’ आलिया सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. यासह नुकताच त्याचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय आलिया लवकरच तिचा पती रणबीर कपूरसोबत पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.