कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याला काही बिग बॅनर सिनेमातून काढले गेले, तर त्याने एका सिनेमाचे शूटिंग केवळ 10 दिवसांतच पूर्ण केले आहे, म्हणून तो चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिकला एक नवीन सिनेमा मिळाला आहे.
View this post on Instagram
एकता कपूरच्या “फ्रेंडी’मध्ये तो लीड रोल करणार आहे. त्याच्याबरोबर हिरोईन म्हणून अलाया फर्निचरवालाने बाजी मारली आहे. “फ्रेंडी’ही एक रोमॅंटिक थ्रीलर फिल्म आहे. याच महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे. अलायाचा हा तिसरा सिनेमा असेल.
View this post on Instagram
यापूर्वी “जवानी जानेमन’मध्ये ती दिसली होती. याशिवाय “यू टर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही ती दिसणार आहे. “यू टर्न’चा हिंदी रिमेकदेखील एकता कपूरच बनवत आहे. म्हणजे अलाया फर्निचरवालाकडे एकता कपूरचा हा दुसरा सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे कार्तिक आर्यनलादेखील एकता कपूरने मदतीचा हात दिला आहे. करिअरच्या अवघड टप्प्यावर त्याला “फ्रेंडी’मिळाला आहे. याशिवाय “सत्यनारायण की कथा’, “कॅप्टन इंडिया’ हे अन्य सिनेमेदेखील आहेत. पण अलायाबरोबर रोमॅंटिक सिनेमा करताना त्याला आणखीन रोमॅंटिक रोल मिळण्याची शक्यता आहे.