आळंदी -खेड तालुक्यातील करोनाची वाटचाल जोरदार सुरूच आहे. आळंदीत गुरुवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 13 रुग्ण आढळून आले आहेत. आळंदी शहरात आतापर्यंत 84 करोना बाधित आढळले असून त्यात 2 मृत्यू तर 30 जणांनी करोनावर मात केली आहे. 52 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, एकाच दिवसात 13 रुग्ण आढळून आल्याने आळंदी शहरातील नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. आळंदीत रेड झोनमधून बरेच नागरिक येत असल्याचे आढळून येत आहे.
तरी बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती नगरपरिषदेला देण्यात यावी जेणेकरून त्या व्यक्तींना क्वारांटाइन करता येईल आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल यासाठी सर्वांनी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.