शिराळा (प्रतिनिधी)- सांगली महापालिका क्षेत्रातील मृत्युदर हा सरासरीपेक्षा जास्त आहे. परराज्यातून पर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांचे मृत्यू प्रमाण जास्त आहे. सांगली जिल्ह्याचे मृत्यू प्रमाण साडेतीन टक्के आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील मृत्युदर हा सरासरीपेक्षा जास्त आहे. देशाचा मृत्युदर 2.44 टक्के आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना कक्षातील एक डॉक्टर व तेथील 3 कर्मचाऱ्यांना ताप आलेला आहे. सांगलीतील एक पोलीस उपनिरीक्षक, दोन वाहतूक पोलिस, आणि आटपाडीतील तीन पोलिसांना त्रास होऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात नवीन 57 पॉझिटिव्ह, शहरी भागात नवीन 6,आणि ग्रामीण भागात 7,अशी आहे. एकूण रुग्ण संख्या 1284 वर पोहोचली असली तरी प्रत्यक्ष उपचाराखाली 560 रुग्ण आहेत.आणि आज बरे झालेली रुग्णसंख्या 682 इतकी आहे.आज अतिदक्षता विभागात 40 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत.आज नवीन आढळलेले रुग्ण हे मनपा क्षेत्र त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लेंगरेवाडी, नागज, भोसे, ब्रम्हणाळ,बांबवडे, मिरज, व सांगली, येथील रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे…. आटपाडी 92, जत 112, कडेगाव 54, कवठेमहांकाळ 33, खानापूर 42, मिरज 83,पलूस 70,शिराळा 160, तासगाव 31, वाळवा 90, मनपा 517 अशी झाली आहे.