आळंदी – येथील श्री. संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची 131 वी पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत आळंदीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक, सांस्कृतिक सभागृह विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संत सावता माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. थोर विचारवंत प्रा. अनिलजी नरके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी व्याख्यान देत कार्य परिचय करून देत विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते मनोज गुंजाळ, अमृतराव काळोखे, आनंदराव कुदळे, वैशालीताई सिनलकर, प्रदेशाध्यक्ष संजयजी जकाते, चंद्रशेखरजी परंडवाल, मंडळाचे मुख्य संघटक महेशजी गोरे, उपाध्यक्ष लक्ष्मणजी सुडे, उपाध्यक्षा मनिषाताई राऊत, कार्याध्यक्ष समीरजी गोरे, सचिव शैलेश जाधव, सहसचिव भानुदास आल्हाट, खजिनदारहर्षल गोरे, सहखजिनदार वैशाली सिनलकर, महिला कार्याध्यक्षा रुपाली रायकर, मुख्य सल्लागार राजाभाऊ लोखंडे, प्रसिध्दी प्रमुख गणेश ताजणे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. उत्तम माटे, संपर्क प्रमुख संदीप धायरकर, आध्यात्मिक विभाग अशोक महाराज साकरे, वधू-वर सूचक चांगदेव गायकवाड, क्रिडा विभाग दिपक वाकचौरे, कायदेशीर सल्लागार अॅड. प्रमिला चवरे यांच्यासह मंडळाचे शैक्षणिक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जालिंदर पिंगळे आदि उपस्थित होते. यावेळी आयोजित मेळाव्यास राज्यातील विविध क्षेत्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून आळंदीत मंडळाच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून श्री. संत सावता महाराज यांच्या मंदिर उभारणीच्या कार्यासाठी अमृतराव काळोखे, आनंदराव कुदळे, साहेब कापरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रा. वैशाली सिनलकर यांना सावित्रीची लेक म्हणून गौरविण्यात यावेळी सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष संजय जकाते यांनी केले. प्रास्ताविक चंद्रशेखरजी परंडवाल यांनी केले. श्री.संत सावता माळी सेवा मंडळाचे प्रमुख संघटक महेश गोरे यांनी आभार मानले.