मुंबई – ऑस्कर विजेत्या हॉलिवूड अभिनेता अल पचिनो वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाल्यामुळे चर्चेत आला. अल पचिनोची 29 वर्षीय गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहने नुकतेच एका मुलाला जन्म दिला. यानंतर हे नातेही काही दिवसातच वादात सापडले. अल पचिनो आणि नूर अलफल्लाह यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अल पचिनोपासून नूरने घटस्फोटाचा निर्णय घेतला असून मुलाचा ताबा मागितल्याचीही चर्चा आहे.
गॉडफादर फेम अल पचिनो आणि नूर यांच्या मुलाचे नाव रोमन पचिनो आहे. याआधी पचिनो त्याच्या गर्लफ्रेंडवर रागावल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, नूरने अल पचिनोपासून गरोदरपणाची बातमी लपवली होती. अशात त्याला राग आला आणि त्याने डीएनए चाचणीबाबत विचारणाही केली. आता अल पचिनोने त्याच्या 54 वर्षांनी लहान असलेल्या नूरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी, अल आणि नूर यांनी न्यायालयात धाव घेतली, ज्यामध्ये नूर अलफल्लाहने मुलाचा ताबा मागितला आहे. मात्र, या वृत्तांवर दोघांचेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.
रिपोर्टनुसार पचिनो आणि नूरचे नाते फार जुने नाही. कोविड 19 च्या वेळी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. एप्रिल 2022 मध्ये व्हेनिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते.