मुंबई – अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमाला मोठे यश मिळाले. या चित्रपटात सनीसह अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत होती. गदरच्या यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने 500 हून अधिक कोटींची कमाई केली आहे.
परंतु अमीषाच्या या चित्रपटातील भूमिकेवर काही जणांनी टीका केली. या चित्रपटामध्ये सकीना अर्थात अमीषा खूपच म्हातारी दिसत असल्याचे म्हणत अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. मात्र आता तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. अमीषा म्हणाली की, “सनी देओलचं वय 65 असलं तर तुम्हाला चालतं, पण मला मात्र म्हातारी म्हणायचं हे काही बरोबर नाही. नेटकरी नेहमीच मला वयावरुन बोलतात.”
पुढे ती म्हणाली, “मी त्यांना सांगेल की, वय हा नेहमीच एक आकडा राहिला आहे. माझं वय जरी हे पन्नाशीच्या जवळ असलं तरी मी अजूनही 20 वर्षाच्या एखाद्या अभिनेत्री प्रमाणे काम करते हे लक्षात घ्या. लोकं बोलताना काहीही विचार करत नाहीत. तुम्हाला अभिनेत्याचं वय जास्त असलं तरी चालतं, पण अभिनेत्रीच्या वयाबद्दल तुम्ही फारच विचार करता,” असे म्हणत तिने वयावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, ‘गदर 2’ ला रिलीज होऊन आता महिना पूर्ण होईल, तरी या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होतांना दिसत नाही. नुकतेच या चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली. त्याला बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. मात्र यावेळी शाहरुख खान आणि सनी देओलच्या फोटोची जोरदार चर्चा रंगली होती.