अक्षय कुमारचा पृथ्वीराज अडचणीत येतो आहे, अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. पृथ्वीराज या शिर्षकाला करणी सेनेने आक्षेप घेतला आहे.
हा चित्रपट महान राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. करणी सेनेने सिनेमाचे शिर्षक बदलण्याची मागणी केली आहे. याशिवाय आणखी काही अटीही ठेवल्या आहेत.
सिनेमाचे शिर्षक केवळ पृथ्वीराज असे न ठेवता राजे पृथ्वीराज यांना साजेसे पूर्ण ठेवण्यात यावे, तसेच सिनेमा आपल्याला दाखवला जावा, अशीही करणी सेनेची मागणी आहे.
पद्मावतच्यावेळी संजय लिला भन्साळीला किती त्रास झाला होता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीराजच्या निर्मात्यांनाही आता आपली मानसिकता तयार करून ठेवावी लागणार आहे, हे नक्की.
अक्षय कुमारने 2019 मध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशी या प्रोजेक्टची घोषणा केली होती. सिनेमात अक्षय कुमारबरोबर मानुषी छिल्लर देखील लीड रोलमध्ये आहे.
हा तिचा पहिलाच सिनेमा असणार आहे. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी पृथ्वीराजचे दिग्दर्शन करणार आहेत. करणी सेनेच्या आव्हानाला आता हे सगळे कसे तोंड देतात, ते लवकरच समजेल.