‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Devdhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) ही जोडी घराघरात पोहचली. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अक्षया एका शोमध्ये झळकली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा नव्या मालिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार असून यावेळी मात्र अक्षया थेट चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकतेच अक्षयाने तिच्या या आगामी सिनेमाचं पोस्टर चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहे. पील्लू बॅचलर असं अक्षयाच्या या सिनेमाचं नाव आहे. सिनेमात अक्षयासोबतच ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे तसंच अभिनेत्री सायली संजीव, शिवाली परब, सविता मालपेकर यांच्या भूमिका आहेत. तर अभिनेता पार्थ भालेराव देखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
तानाजी घाडगे यांनी पील्लू बॅचलर या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसंच मंगेश कांगणे यांनी या सिनेमाचं गीतलेखन केलं आहे. तर चिनार महेश यांचं संगीत दिग्दर्शन आहे. पील्लू बॅचलर सिनेमा येत्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.