Entertainment : झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) घराघरात पोहचली. या मालिकेतील त्यांच्या पाठकबाई आणि राणा दा या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेनंतर त्यांचे खऱ्या आयुष्यातही एकमेकांवर प्रेम जडले आणि 2 डिसेंबर रोजी दोघे लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त अक्षया आणि हार्दिकने खास फोटो शेअर केले आहेत.
अक्षया आणि हार्दिकने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर हार्दिक सोबतचे फोटो शेअर ‘एक वर्ष सरले, आता आयुष्यभर एकत्र राहू. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक जोशी. माझा नवरा, माझा जोडीदार, माझा प्रियकर आणि माझा जिवलग मित्र असल्याबद्दल धन्यवाद. माझं तुझ्यावर प्रेम आहे,’ असे लिहिले आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
तर हार्दिक जोशीनेदेखील त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस. एक वर्ष एकत्र आनंदी गेल्यासाठी हार्दीक शुभेच्छा, माझे प्रेम अक्षया देवधर,’ असे लिहिले आहे. अक्षया आणि हार्दिकच्या पोस्टनंतर त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या हार्दिक स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘जाऊ बाई गावात’ नव्या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसणार आहे.