South Movie – तब्बल 27 वर्षांनंतर सुपरस्टार कमल हासन त्याच्या इंडियन चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग देखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी इंडियन 2 चा टीझर रिलीज केलाय.
निर्मात्यांनी हा व्हिडिओ इंडियन 2- एन इंट्रो नावाने जारी केला आहे, ज्यामध्ये कमल हासन अतिशय आकर्षक लूकमध्ये दिसत आहेत आणि या टिझरमध्ये दमदार डायलॉगसह कमल हसनची एंट्री होतांना दिसते. व्हिडिओची सुरुवात अनिरुद्ध आणि कमल हसन यांच्या नावाने होते. कमल हासन या चित्रपटाचा मुख्य नायक आहे, तर अनिरुद्ध चित्रपटाला संगीत दिले आहे.टीझरमध्ये कमल हसन व्यतिरिक्त दाक्षिणात्य कलाकार सिद्धार्थ, ब्रह्मानंदम, देखील दिसत आहेत. या स्टार्सशिवाय काजल अग्रवाल, एसजे सूर्या हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. एस शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
हा चित्रपट तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये इंडियन 2 म्हणून प्रदर्शित होत असताना, हिंदीमध्ये त्याचे नाव हिंदुस्थानी 2 ठेवण्यात आले आहे. त्याच नावाने हिंदी टीझरही रिलीज झाला आहे. जर आपण रिलीजच्या तारखेबद्दल बोललो तर, सध्या त्याबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. इंडियन चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता, जो खूप आवडला होता. चित्रपटात कमल हसनशिवाय मनीषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर दिसल्या होत्या.